
Literature and Fiction
Mi Tuza
चारोळी ह्या काव्यप्रकाराशी ओळख झाल्यावर एक प्रयोग
म्हणून वेगवेगळ्या विषयांवर चारोळ्या लिहिण्याचा प्रयत्न
केला आणि बघता बघता शंभर चारोळ्यांचा एक सुंदर
सा काव्य गुच्छ तयार झाला, जो आपणा सर्वानं पुढे ठेवत
आहे. इथे प्रेम, विरह, नाते-संबंध, दैनंदिन आयुष्यातील
निरनिराळे अनुभव, निसर्ग अश्या भिन्न भिन्न विषयांवरच्या
चारोळ्या वाचावयास मिळतील. एक कवी म्हणून काही
चारोळ्यांमध्ये माझ्या वैयक्तिक आयुष्याचे काही संदर्भ असू
शकतात, तरीही वाचकाला प्रत्येक चारोळीचा स्वतंत्र आनंद
घेता येईल. पुस्तक वाचताना एका चारोळीकडे बघण्याचा
प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा वेगळा असु शकतो, आणि हीच
खरी गम्मत आहे. मला आशा आहे कि ह्या पुस्तकात आयुष्याकडे
बघण्याचा एक नवीन दृष्टीकोन देणारी एक तरी चारोळी
प्रत्येकाला मिळेल. शेवटी कविता म्हणजे ओळींपेक्षा
ओळींच्या मधये बरच काही सांगायचा एक प्रयत्न असतो, आणि
असाच एक प्रयत्न ह्या पुस्तका मार्फत मी ही केला आहे.